Site icon e लोकहित | Marathi News

ड्रॅगन फ्रुट या परदेशी फळाची शेती करा आणि कमवा लाखो रुपये; सरकार देखील देते अनुदान

Farm dragon fruit exotic fruit and earn millions of rupees; Government also provides subsidy

फळ उत्पादनात भारत जगात आघाडीवर असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी केले होते. दरम्यान महाराष्ट्रात दिवसेंदिवस फळबागांच्या शेतीचे विविध प्रयोग होत आहेत. यामध्ये परदेशी फळांची शेती सुद्धा केली जात आहे. श्रीलंका थायलंड, व्हिएतनाम आणि इस्त्रायलमध्ये केली जाणारी ड्रॅगन फ्रुट ची शेती सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत देखील केली जात आहे.

धक्कादायक! दोन बसचा भीषण अपघात, 40 जागीच ठार तर 87 गंभीर जखमी

महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी अनुदाने दिली जात आहेत. हरियाणा सरकार ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी शेतकर्‍यांना प्रति एकर १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देते. ड्रॅगन फ्रुटच्या ( Dragan Fruit) शेतीतून वार्षिक 8 ते 10 लाखांची कमाई होते. मात्र सुरुवातीच्या काळात 4 ते 5 लाखांचे भांडवल गुंतवावे लागते. ड्रॅगन फ्रुट अनेक ठिकाणी उपयोगी पडते. यामुळे बाजारात देखील ड्रॅगन फ्रुटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

“आज मैं मूड बना लिया…”, गाण्यावर अमृता फडणवीस यांचा पुन्हा ठुमका; पाहा VIDEO

ड्रॅगन फ्रुटपासून मुख्यतः जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईन सुध्दा बनवता येते. तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये फेस पॅक साठी ड्रॅगन फ्रुटचा वापर करण्यात येतो. याशिवाय ड्रॅगन फ्रुट हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे, साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवणे, पचनक्रिया सुरळीत होणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, दात व हिरड्या मजबूत होणे यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरते.

बिग ब्रेकिंग! ‘गे’ जोडप्याला होणार मुल; ४ वर्षापूर्वी केले होते लग्न

Spread the love
Exit mobile version