Agri News । शेती करताना अनेकदा शेतीशी (Agriculture) निगडित काही वस्तूंची गरज पडते. अनेकदा या वस्तूंचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. सर्वच शेतकऱ्यांकडे पैसे असतातच असे नाही. बँकेकडून कर्ज (Bank Loan) घेतले तर त्यांचा व्याजदर जास्त असतो. अशातच सरकार या शेतकऱ्यांना सतत मदत करत असते. सरकारची अशीच एक योजना आहे ज्याच्या माध्यमातून 3 लाख 55 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. (Latets Marathi News)
Onion Price । कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! दरात होणार विक्रमी वाढ
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
खरंतर अलीकडच्या काळात शेडनेट शेतीला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये तापमान नियंत्रित करून कोणतेही पीक वर्षभर घेता येते. परंतु शेडनेट उभारणीच्या खर्चाचा विचार केला तर तो खूप जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेडनेट उभारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून शेडनेट हाऊससाठी अनुदान देण्यात येत आहे. (Shadenet Subsidy)
Pulses Rate । सणासुदीच्या तोंडावर डाळींनी खाल्ला भाव! किलोला मिळतोय ‘इतक्या’ रुपयांचा दर
किती मिळेल अनुदान?
- एक हजार आठ चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटसाठी 3 लाख 55 हजार रुपये अनुदान मिळते.
- 2048 चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटसाठी 7 लाख 10 हजार रुपये अनुदान मिळते.
- 3 हजार 40 चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटसाठी 10 लाख 65 हजार रुपये अनुदान मिळते.
- 4 हजार चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटसाठी 14 लाख 20 हजार रुपये अनुदान मिळते.
One Nation One Election । ‘वन नेशन-वन इलेक्शन’ होणार? केंद्र सरकारकडून समिती स्थापन
आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला या अनुदानाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात सातबारा उतारा, लाभार्थी शेतकरी जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील तर त्यांच्याकरिता संवर्ग प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला, आठ अ चा नमुना,हमीपत्र, आधार कार्ड, आधार संलग्न असलेले राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत असावी. तुम्हाला mahadbtmahait.gov.in या वेबसाइटवर अर्ज करता येईल.
Political News । महाराष्ट्र हादरला! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याने केली आत्महत्या