Dragon Fruit Farming । शेतकरी बांधवांनो, ड्रॅगन फ्रुट लागवड करून मिळवा सरकारी अनुदान

Farmer brothers, get government subsidy by planting dragon fruit

Dragon Fruit Farming । आता राज्यातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामुळे त्यांना शेतीमधून पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमावता येत आहेत. शिवाय त्यांना राज्य सरकार (State Govt) अनुदान (Subsidy) देत आहे. उत्पन्न जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. विशेष म्हणजे सध्या तरुणवर्ग नवनवीन प्रयोगासह शेतीमध्ये विविध फळ पिकांची लागवड करत आहेत. (Latest Marathi News)

Ekanth Shinde । “गेल्या वर्षभरापासून विरोधकांकडून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय”, पण.. ; एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य

त्यापैकी एक फळ म्हणजे ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) होय. अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. हे फळ अनेक आजारांवर आणि त्वचेसाठी गुणकारी असल्याने त्याची राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड (Dragon Fruit Cultivation) करत आहेत. तसेच ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान देत आहे. जर तुम्हालाही अनुदान (Dragon Fruit Subsidy) मिळवायचं असेल तर तुम्हाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागणार आहे.

Ola S1 X । ओलाने लॉन्च केल्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, 151 किमी रेंज आणि शानदार फीचर्ससह किंमत आहे..

किती मिळते अनुदान

राज्य सरकारमार्फत एक हेक्टरवर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी ४ लाख रुपयांचा खर्च निश्चित केले आहे. त्यापैकी एकूण ४० टक्के रक्कम म्हणजे १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान एकाच वेळी न देता तीन टप्प्यात दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.20 हेक्टर जमीन असावी.

Health Insurance । ज्येष्ठ नागरिकांसाठी किती महत्त्वाचा आहे आरोग्य विमा? घेण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

कोणत्या कामासाठी मिळते अनुदान

या फळाच्या लागवडीकरिता आवश्यक असणारे खड्ड्यांची खोदाई, खांबांवर प्लेट लावणे, आवश्यक असणारे सिमेंट काँक्रीटचे खांब उभारणी करणे, रोपांची लागवड करणे, ठिबक सिंचन, खतांचे व्यवस्थापन आणि पिक संरक्षण यासाठी अनुदान दिले जाते.

Jayakwadi Dam Water Storage । मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट, जायकवाडी धरणात फक्त 34 टक्के पाणीसाठा

आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवरची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, सातबारा उतारा, ८ अ चा उतारा, बँक खाते, विहित नमुनातील हमीपत्र आणि इतर कागदपत्रं असावीत.

Ajit Pawar । “.. तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील”, भाजपने अट ठेवल्याचा ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Spread the love