मुंबई : कॅक्टस अर्थात निवडुंग याची याची लागवड आपण आपल्या शेतीच्या बांधावर करूनदेखील चांगली कमाई करू शकतो. या वनस्पतीला देश विदेशात जास्त मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्या लागवडीने आर्थिक फायदाही चांगला होतो. तेल, शॅम्पू, साबण आणि लोशन यांसारखी सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी निवडुंगाचा वापर करतात. त्यामुळे निवडुंगाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी प्रमाणात मागणी असते.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी घेतले अभिनेते नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन
निवडुंग लागवडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे शेतकरी शेतीच्या बांधावर देखील निवंडुगाची लागवड करू शकतात. महत्वाचं म्हणजे काही भागांमध्ये विशिष्ट प्रकारची निवडुंग (Cactus) जणावरांना उन्हाळ्यात खाण्यासाठी देखील दिली जातात. निवडुंगाची लागवड जून-जुलै ते नोव्हेंबर या काळामध्ये केली जाते.
Chandrasekhar Bawankule: शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये – चंद्रशेखर बावनकुळे
निवडुंगाची लागवड करताना एक महत्वाची बाब म्हणजे निवडुंग लागवड करताना शेताची माती खारट (soil salty) असावी. निवडुंगाचे रोप योग्य प्रकारे तयार झाल्यानंतर, जेव्हा त्याचे रोप १ मीटर उंच होईल आणि ५ ते ६ महिने पूर्ण झाले असतील तेव्हा शेतकर्यांनी त्याची योग्य ती कापणी करावी.
दूध उत्पादन करताय? तर मग ‘या’ 4 जातींच्या म्हशी ठरत आहेत फायदेशीर? वाचा सविस्तर