विमानाचा प्रवास हा अतिशय खर्चिक असतो. सर्वसामान्य लोकांना तो परवडतही नाही. यामुळे ‘विमानात बसून प्रवास करणे’ हे कितीतरी लोकांचे स्वप्न असते. मात्र नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शेतकरी आजी आपल्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाचा आनंद घेताना पहायला मिळत आहेत.
RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला मिळाला ऑस्कर अवॉर्ड!
शेतात राबणाऱ्या या आजींच्या विमान प्रवासाचा अनुभव पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. खरंतर ही आजी प्रसिद्ध युट्यूबर असून तिचे मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. हैदराबाद येथील एका गावात राहणाऱ्या या आजीचे नाव मिल्दुरी गंगाव्वा ( Milduri Gangvva) असून तिचे युट्यूबवर लाखो फॉलोवर्स आहेत.
माधुरी दीक्षितचे ‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते अफेअर; वाचा अभिनेत्रीची Lovestory
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही आजी अतिशय संकोचाने विमानात चढताना दिसत आहे. यानंतर ती आपला सीट बेल्ट लावून आरामात विमानात बसते. ज्यावेळी विमान आकाशात उडू लागते, त्यावेळी अतिशय उत्सुकतेने आजीबाई आजूबाजूला बघू लागते.
शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
खिडकीतून खाली बघताना आजींना भीती देखील वाटते. या व्हिडीओमध्ये आजींनी निरागसता दिसत आहे. विमानातून खाली उतरताच आजी आनंदाने उडी मारू लागते. या विमान प्रवासाचा ( Airoplane Journey) संपूर्ण अनुभव आजींनी तेलुगू भाषेत सांगितला आहे. या व्हिडीओला प्रचंड व्ह्यूज मिळाले असून यावर विविध प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता!