मागच्या पाच सहा दिवसापूर्वी राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. राज्यातील तापमानात (Tempreture) सातत्यानं चढ उतार होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून (14 मार्च) राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर गारपीठ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
धक्कादायक! कोपर्डीतील ५ वर्षीय चिमुकल्याचा बोअरवेलमध्ये पडून दुर्दैव मृत्यू
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि आता पाऊसामुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी राजा आता दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान कृषी विभागानं केलं आहे.
सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार; 19 लाख कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग
मागच्या आठवड्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला होता यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते आणि आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. आज मराठवाड्यातील बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, आणि जालना जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळच्या विश्वासू व निष्ठावान कार्यकर्त्याने केला शिंदे गटात प्रवेश!