Farmer News । यावर्षी जून मध्येच सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.शेतकरी पेरणीसाठी बियाणे अन खते खरेदी करत आहेत.काही वेळा बहुतांश ठिकाणी बियाणे आणि खत कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारली जातात.याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक नुकसान होऊन पूर्ण हंगाम वाया जातो.तसेच कंपनी कडून शेतकर्यांना नुकसान भरपाई सुद्धा दिली जात नाही.
Nilesh Lanke | अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना टोला, पाहा व्हिडीओ
यावर्षी खरीप हंगाम 2024 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकाऱ्यांच्या मध्ये जागृती करून बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे.शेतकऱ्यांनी बियाणे,खते खरेदी करताना दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे तसेच पेरणी नंतर बियाणांचे पॅकेट बिल जपून ठेवावे.ज्या ज्या शेतकऱ्यांचे बोगस बियाणे खते मध्ये फसवणूक होईल त्यांनी संभाजी ब्रिगेड सोबत संपर्क करण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.
Politics News । सर्वात मोठी बातमी समोर! अजित पवारांच्या गटानंतर शिंदे गटात नाराजी
बोगस बियाणे,खत तयार करणाऱ्या कंपन्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने टाळे ठोकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक असेल अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी सांगितले आहे.
Narendra Modi | “मी नरेंद्र दामोदरदास मोदी…”, PM मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून इतिहास रचला