बरेच शेतकरी कापूस पिकाचे उत्पादन घेत आहेत. परंतु शेतकऱ्यांचं (Farmers) दुर्दैवच म्हणाव लागेल की, मागच्या काही वर्षापासून कापूस पीक (cotton crop) तोट्याचे ठरत आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे कापूस पिकाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतकंच नाही तर पाऊस आणि कीड तसेच रोगामुळे कापूस पिकाचे नुकसानही वाढले आहे. यामध्येच भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मोठी बातमी! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत मैदानात
केंद्र सरकारकडे बऱ्याच वेळा मागणी करून देखील कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान मिळाले नाही. यामुळें संतप्त होऊन अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अखतवाडे येथील संतप्त शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. सध्या त्यांच्या आंदोलनाची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.
गौतमी पाटीलचा ‘हा’ आहे आवडता क्रिकेटर; स्वतःच याबाबत केला खुलासा
या शेतकऱ्यांनी स्वतःला कापसात गाडून घेत सरकारचा निषेध केला. अखतवाडे येथे शेतकरी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडे बऱ्याचदा मागणी करुन देखील कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रूपये अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आता मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
धक्कादायक! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने केला हल्ला; दोनजण गंभीर जखमी