शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून फायदा व्हावा तसेच शेतकऱ्यांची (farmers )कामे कशी सोप्पी व्हावी यासाठी सरकार योजना राबवत असत. दरम्यान आता शासनाने शेतकऱ्यांची शेतजमीन (farm land) नवीन नियम जारी केले आहेत. याआधी सरकारने असा नियम (rules) काढला होता ज्याने शेतकऱ्यांना जमीन विक्री करणे मुश्किल झालं होते. बागायतीसाठी 20 आणि जिरायतीसाठी 40 अशी अट घालून देण्यात आली होती.
15 ऑक्टोबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम,यंदा 3,050 रुपये एफआरपी
परंतु आता तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947 मध्ये बदल करुन आता जिरायतीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 5 गुंठेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. म्हणून आता शेतकऱ्यांना शेतजमिनीचे (land) व्यवहार करणे सोपे होणार आहे. या प्रस्तावावर ऑक्टोंबर महिन्यात निर्णय होईल अशी माहिती दिली आहे. जिरायत जमीन ही 2 एकरपेक्षा कमी असल्यास विकता येणार नाही तर बागायत जमीन ही 20 गुंठे म्हणजे 1 एका एकरापेक्षा कमी असली तर विकता येत नव्हती.
Lumpy: लम्पी रोगाचा राज्यात धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यात मनुष्यबळ कमी, तरी लसीकरणात अव्वल
तसेच 2 एकराच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीन देखील विकता येत नव्हती. त्यामुळे शेतातील वाटेवरुन आणि बांधावरुनही भांडण-तंटे वाढल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.म्हणून राज्य शासनाकडे नागरिकांच्या सूचना आणि हरकती पाठवण्यात आल्या आहेत.त्यामुळे नियमामध्ये बदलाचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.