मुंबई : राज्याचा शेतकरी (farmer) राजासमोर सध्या अनेक संकटांना समोर जावं लागतं आहे. पाऊस,हवामान, कीटक-रोगांचा प्रादुर्भाव किंवा अनेक वेळा शेतकऱ्याला मजबुरीने येऊन शेतातील उभी पिके नष्ट करावी लागतात. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत लम्पी (lumpy disease) रोगामुळे शेतकऱ्यांची अनेक जनावरे दगावली आहेत. हे एक संकट समोर असतानाच आता शेतात देखील चायनीज व्हायरस आला आहे. दरम्यान आज पंजाबमधील(Punjab) चायनीज व्हायरस (Chinese virus) देखील अशाच एका संकटाला तोंड देत आहेत.
पंजाबमधील सुमारे 14 जिल्ह्यांमध्ये धोकादायक चायना विषाणूने 34 हजार 374 हेक्टर क्षेत्रातील भात पिकाला घेरले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शेतकर्यांना स्वतःच ट्रॅक्टर चालवून भात पिक नष्ट करावे लागत आहे. हा साऊथ साइड ब्लॅक स्ट्रीक्ड ड्वार्फ व्हायरस (SRVSDV चायनीज व्हायरस) आहे. या रोगामुळे, भात पिकाची बहुतेक झाडे बौने राहतात, ज्यातून भाताचे उत्पादन घेता येत नाही.
धान उत्पादक राज्य म्हणून पंजाब राज्याला ओळखले जाते. दरम्यान पंजाबमधील शेतकरी खरीप हंगामात आपल्या शेतात भात लावतात, ज्यामुळे देशाच्या आणि जगाच्या गरजा पूर्ण होतात. परंतु चायना विषाणूमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पदरी नुकसान येत आहे. तसेच पीक निकामी झाल्याने भात उत्पादनात 4.8 टक्क्यांनी घट होऊ शकते.
मोठी बातमी! मनेसे नेते वृशांत वडके यांच्यावर बलात्काराचा आरोप; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
या समस्येमुळे समराळा येथील तोडपूर गावात दोन शेतकऱ्यांनी 15 एकर उभ्या असलेल्या भात पिकावर ट्रॅक्टर चालवला. चायना विषाणूमुळे समस्या वाढत असताना अमृतसर, फरीदकोट, फतेहगढ साहिब, लुधियाना, पटियाला, पठाणकोट, रोपर, संगरूर, गुरुदासपूर, होशियारपूर, जालंधर, कपूरथला, मोहाली आणि नवांशहर या जिल्ह्यांतील भातपिकांचे १५ ते २० टक्के नुकसान होणार आहे.