शेतकऱ्यांनो सावधान! गाई- म्हशींना होतोय ‘हा’ गंभीर आजार, ‘असा’ करा बचाव

शेतकरी (Farmers) शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. मग यामध्ये गाई (cow), म्हशी किंवा मग शेळीपालन असो. परंतु जर तुम्ही पशुपालनामध्ये गाई आणि म्हशींचे (buffalo) पालन करणार असताल तर त्यांचे व्यवस्थापन वेगवेगळ्या पद्धतीने करणे खूप गरजेचे असते. व्यवस्थापनामध्ये नेमक काय करायचं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग यामध्ये आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये झालेला ढिसाळपणाचा प्रत्यक्ष परिणाम दूध उत्पादनावर होतो व दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे साहजिकच आर्थिक नुकसान होते.

अन्नदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेतून रांजणगाव (सां) येथील युवकांचा कौतुकास्पद उपक्रम: आदर्श युवा सरपंच स्नेहल काळभोर

जर तुमचे व्यवस्थापन उत्तम आणि व्यवस्थित असेल तर पशुपालन (animal husbandry) व्यवसायाच्या माध्यमातून निश्चितच आर्थिक फायदा मिळतो. व्यवस्थापनमध्ये आरोग्य व्यवस्थापन हे देखील खूप गरजेचे आहे. कारण जनावरांना आजार होऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे असते. कारण गाई-म्हशींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. दरम्यान या लेखात आपण असाच एक गाई म्हशींना होणाऱ्या गंभीर आजार याविषयी माहिती पाहणार आहोत.

मोठी बातमी! रेल्वेचा मोठा अपघात, 15-20 डब्बे रुळावरून घसरले

गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजार

1) आजार होण्याची कारणे – फऱ्या आजाराचा प्रादुर्भाव खरतर पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होतो. महत्वाची बाब म्हणजे हा आजार क्लॉस्टीडियम सोव्हीइ या जिवाणूमुळे होतो. इतकंच नाही तर हा आजार होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे गोठयामधील असलेली अस्वच्छता.

शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी, पंधरा दिवसांत सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी

2) जनावरांमध्ये या आजाराची दिसणारी लक्षणे – फऱ्या हा आजार जनावरांना झाल्यावर जनावरे खाणे,पाणी पिणे आणि रवंथ करणे बंद करतात. इतकंच नाही तर जनावरांच्या फऱ्यावर गरम सूज येते व ती नंतर थंड होते. दरम्यान सूज आलेल्या ठिकाणी दाबल्यावर कर्कश असा आवाज येतो. तसेच प्राण्याला चालता देखील येत नाही.

बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा

3) आजार टाळण्यासाठीच्या उपाययोजना – फऱ्या हा आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवायचे असेल तर तलाव किंवा नदीचे पाणी जनावरांना जास्त करून प्यायला देऊ नये. इतकंच नाही तर आजारी जनावर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. तसेच जनावरांना चारा देताना अगोदर निरोगी जनावरांना चारा किंवा पाणी द्यावे.

4) या आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची खबरदारी

ज्या जनावरांना लसीकरण केले नसेल तर त्यांना ट्रायओव्हॅकची लस द्यावी. इतकंच नाही तर पेनिसिलीन, टेट्रासायक्लीनची इंजेक्शन जनावरांना द्यावीत . दरम्यान सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पशु वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधून सगळे उपचार करावेत. दरम्यान जर एखादे जनावराचा गोठ्यात मृत्यू झाला तर ती जागा फिनाईलने स्वच्छ धुवून घ्यावी.

तरुणांनो सावधान! आता ‘आयटम’ शब्द वापराल तर येईल होईल शिक्षा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *