Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ 17 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Farmers beware! Heavy rain will fall in these 17 districts

Weather Update : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांशी भागात विशेषता मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअस पार गेले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरीक अगदी हैराण झाले आहेत.

लग्न होऊन १२ वर्ष झाले तरीही मुलबाळ होत नव्हते, यांनतर बायकोसोबत नवऱ्याने केले भयानक कृत्य; ऐकून बसेल धक्का

देशातील इतरही भागात तापमानाने अनेक विक्रम मोडले आहेत. यादरम्यान आता मानसून आगमनाची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे यंदा केरळात तीन दिवस उशीर आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा तरी मान्सूनचे आगमन होईल, खरीप हंगामातील पीक पेरणी वेळेत पूर्ण होईल आणि या हंगामातून तरी चांगला नफा मिळवता येईल अशा लावून सध्या शेतकरी बसले आहेत.

नवरा लपून-छपून पाहत होता सुंदर मुलींचे फोटो, बायकोला माहित होताच तिने केलं असं की…, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

केरळमध्ये 4 जूनला मान्सून दाखल होईल. त्यानंतर एका आठवड्यात तळकोकणात येईल. चार पाच दिवसांनी राजधानी मुंबईत लवकरच मान्सूनचे आगमन होईल. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात मान्सून हजेरी लावणार आहे. तसेच, राज्यात आज आणि उद्या अर्थातच 29, 30 मे 2023 रोजी काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काल रात्री नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महिलेने मारली थेट पोलिस अधिकाऱ्याच्या कानाखाली; पाहा Video

यादरम्यान, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क रहावे लागणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“मरने का किसको ख़ौफ़ यहाँ”, विनेश फोगाटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तसेच, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 17 जिल्ह्यात‌ उद्या 30 मे मंगळवारी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कामाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

नवरा शहराबाहेर असताना पत्नीचे दिरावर जडले प्रेम! एके दिवशी रात्री अंधारात…

Spread the love
Exit mobile version