
मुंबई : राज्यात अतिृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान अशातच आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभ राहील आहे. ते म्हणजे पिवळ्या विषारी ‘घाेणस अळी’ (Filthy worm) बांधावरील गवत, एरंडी, आंबा झाडे व फळपिकावर (fruit crops) ती आढळून येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या अळीच्या अंगावरील बारीक काट्यांत विषग्रंथी (poison gland) आहेत. आणि तो काटा माणसाच्या त्वचेत टोचून अळी विषारी रसायन शरीरात सोडते. पुढे याचा त्वचेवर परिणाम होऊ लागतो.जसजसा परिणाम होऊ लागतो तसतशी व्यक्ती बेशुद्धही पडूताे.
Onion: दिवाळीपर्यंत कांदा दरवाढीची शक्यता, महाराष्ट्राच्या कांद्याच्या मागणीला परराज्यातून वाढ
या अळीने पूर्व विदर्भानंतर आता पश्चिम विदर्भात शिरकाव केला आहे. रविवारी वाशिम जिल्ह्यातील माळशेलू येथील महिला शेतात काम करीत असताना या अळीने तिला डंख मारला, यामुळे त्या महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. घोणस अळी शेतकऱ्यांना चावा घेत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान यावर लवकरात लवकर उपाय शोधण्याची गरज आहे.
Maize Crop: मक्याचे दर टिकून राहतील? पाहुयात नेमकी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
दरम्यान आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, रांजणगाव आणि गिरसावळी येथील तीन शेतकऱ्यांना घाेणस अळीने शेतकरी जखमी झाले आहेत. या शेतकऱ्यांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. पण या घटनेमुळे फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. तसेच सोयाबीनवर विदर्भातील काही भागांत घोणस विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
Sanjay Raut: मोठी बातमी! राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी