मुंबई : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चार मंडळातील शेतकऱ्यांनी (farmers) संप सुरू केला आहे. या संपाच (strike) कारण म्हणजे अतिवृष्टीच्या अनुदान यादीतून वगळले गेल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रतीकात्मक पुतळा (statue) जाळला. दरम्यान या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा गोरेगाव पोलीस ठाण्यात 21 शेतकऱ्यांवर गुन्हा (crime) दाखल झाला आहे.
Sharad Pawar: “दसरा मेळाव्याचा एकनाथ शिंदेंनाही अधिकार,पण….”, शरद पवारांनी मेळाव्यावर व्यक्त केले मत
या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्याचे जमादार गजेंद्र सुभाषराव बेडगे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये जमाव बंदीचे आदेश असतानाही शेतकऱ्यांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे. तसेच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, जमादार बेडगे मैदनकर यांनी भेट दिली आहे. शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी, कोविडमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करावे यासह इतर मागण्यांसाठी संप सुरू होता.
Onion: दिवाळीपर्यंत कांदा दरवाढीची शक्यता, महाराष्ट्राच्या कांद्याच्या मागणीला परराज्यातून वाढ
हा संप होऊन चार दिवस झाले तरी देखील प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नाही. म्हणून आता ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे तर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.