Agricultural News । यावर्षी राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार (Heavy Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. परंतु अजूनही काही जिल्ह्यात पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरीही पाऊस पावसाविना पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जर आणखी काही दिवस या जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. (Latest Marathi News)
ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘त्या’ 5 खासदारांवर होणार कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून बी-बियाणे, खतांची खरेदी केली आहे. परंतु चांगला पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. थोड्याशा पाण्यावर त्यांनी मका, सोयाबीन, बाजरी यांसारख्या पिकांची पेरणी केली होती. ही पिकेदेखील पाण्याअभावी जळू लागली आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न उद्भवू लागला आहे.
त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी अर्थिक मदत करण्यात यावी, पीक विमा कंपन्यांनी पंचनामे करून विम्याची भरपाई देण्यात यावी. पावसाअभावी शेतकऱ्यांवर आर्थिकक संकट आले आहे. सरकारने याची गंभीर दखल घेत दुष्काळ (Drought) जाहीर करून प्रति एकरी पिकनिहाय आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
Havaman Andaj । राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार? पावसासाठी पोषक वातावरण तयार
हे ही पहा