भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील अनेक शेतकरी भातशेतीकडे वळले आहेत. जर तुम्हाला या शेतीतून जास्त पैसे कमवायचे असतील तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही जर आता काळ्या तांदळाची शेती केली तर तुम्ही लखपती होऊ शकता. कारण साधारण तांदळापेक्षा या तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. (Agriculture News)
इतकेच नाही तर हा तांदूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या तांदळामुळे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. तसेच रोग प्रतिकारक शक्तीदेखील वाढते. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना हा तांदूळ खाण्याचा सल्ला देतात. इंग्रजीत या तांदळाला ब्लॅक राईस किंवा ब्लॅक पॅडी असेही म्हटले जाते. शिवाय हा तांदूळ शिजवला तर याचा रंग बदलतो. (Latest Marathi News)
समजा आता शेतकऱ्यांनी एक हेक्टरमध्ये काळ्या भाताची लागवड केली तर त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याचे उत्पादन सुरुवातीला चीन या देशामध्ये सुरू झाले. त्यानंतर ते भारतात आले. भारतात या पिकाची लागवड सुरुवातीला मणिपूर आणि आसाममध्ये झाली. त्यानंतर सिक्कीममध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही या पिकाचे उत्पादन घेण्यात येते. याची लागवडही सामान्य भाताप्रमाणे असते. हे पीक 100 ते 110 दिवसांत तयार होते.