Site icon e लोकहित | Marathi News

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हजारोंचे अनुदान; राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सरकारचा मोठा निर्णय

Farmers doing natural farming will get thousands of subsidies; Big decision of the government on the occasion of National Farmers Day

तंत्रज्ञानात ज्या वेगाने प्रगती होत गेली त्या वेगाने सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रांचा वापर वाढला. आजकाल शेतीमध्ये देखील आधुनिक पध्दतीने प्रयोग केले जातात. वेळेची, पैशाची आणि कष्टाची बचत व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सोयीचे वाटते. परंतु, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत आहे. यामुळे अलीकडच्या काळात सरकार देखील नैसर्गिक शेतीवर भर देत आहे. हरियाणा सरकारने ( Hariyana Government) तर याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

तुनिषाच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट समोर; गरोदर असण्याबाबत मोठा खुलासा

आधुनिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा वाढत जाणारा उत्पादन खर्च वाचण्यासाठी हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती ( Natural Farming) करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी मोठा निर्णय देखील घेतला आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून देशी गायींच्या खरेदीवर 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याबाबतची माहिती कृषीमंत्री जे पी दलाल यांनी माध्यमांना दिली आहे.

गायरानसाठी राखीव असलेल्या जमिनीचा ताबा खासगी व्यक्तींच्या नावे करण्याचा आदेश दिल्याने अब्दुल सत्तार अडचणीत

राष्ट्रीय किसान दिनाच्या ( National Farmers Day) पार्श्वभूमीवर हरियाणाचे कृषिमंत्री जे पी दलाल ( J P Dalal) यांनी शेतकऱ्यांना एवढे मोठे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी ‘शेतकऱ्यांनी किमान आपल्या चांगल्या उपजीविकेसाठी तरी नैसर्गिक शेती करावी’. असे आवाहन केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत जागरूक करण्यासाठी हरियाणा सरकारने पुढाकार घेतला असून कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी विविध सत्रांचेही आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती दलाल यांनी दिली.

देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी माहिती आहे का? वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version