मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra ) धुमाकूळ घातला आहे. अशातच गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे (Monsoon Return Rain) मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांच्या (Farmers) शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
नेहाची पुन्हा एन्ट्री होणार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहाचा नवा लूक चर्चेत
यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश दिले. तसेच पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना देखील सत्तार यांनी दिल्या. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या पिकाच्या पंचनाम्यानंतर तत्काळ 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होणार, अस देखील यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.
Ketaki Chitale: “10 वर्षांनंतर मला तुरुंगात…” पुन्हा एकदा केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
तसेच पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता भक्कम धीर धरावा. कारण राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी राज्याचा कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. म्हणून तुम्ही शेतकऱ्यांनी अजिबात निराश आणि हताश होऊ नये.
मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला जाणे पडले महागात, धबधब्याच्या पाण्यात बुडून चार मित्रांचा मृत्यू
पावसामुळे नुकसान झालेल्या कापूस, मका, सोयाबीन या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पोहचताच याबाबत मंत्रिमंडळ बैठक ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल,असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
खडकी येथील श्री गणेश सहकारी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना साखर वाटप