बारामती (Baramati) तालुक्यातील श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा (sugar factory) 61वा आणि दि.माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 66वा गळीत हंगामाचा शुभारंभ झाला.यावेळी आयोजित केलेल्या शेतकरी (Farmers) मेळाव्यात कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, कार्यकर्त्यांना संबोधित केलं.यावेळी कार्यक्रमात बोलताना, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी राज्यातील विकासकामांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लक्ष केलंय.
अल्पवयीन मुलाला फुस लावून नेले पळवून, पुढील तपास सुरू
शिंदे सरकारच्या कारभारावर अजित पवार यांनी बोचरी टीका केली आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच काय चाललंय याकडे लक्ष न देता आपापल्या शेतात कामात लक्ष द्या. एवढच नाही तर अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद गेलं आता त्याचं काय होणार? याचा विचारचं करू नका. कारण अजित पवार तेव्हा पण काम करत होता आणि आताही काम करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar: “शिवसेनेनेही नवीन चिन्ह घ्यावे आणि निवडणूक लढवावी” – शरद पवार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्तृत्वाखालील राज्यातील सरकारने लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. इतकंच नाही तर सत्तेतील अधिकाऱ्यांनासुद्धा कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही, हे कळत नाही. दरम्यान याचा थेट परिणाम राज्यातील विकासकामांवर होत आहे.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारनं साखर उद्योगातील अडचणींबाबत योग्य धोरण आखणं आवश्यक आहे. म्हणून यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून शेतकऱ्यांचं हित जोपासत राहू अशी ग्वाही यावेळी दिली.
श्रीगोंदा तालुक्यातील पट्ठ्या लिंबातून कमवतोय वर्षाकाठी चार ते साडेचार लाख रुपये
केंद्र सरकार उत्तर प्रदेशचे हित डोळ्यासमोर ठेऊन साखर निर्यातीचा कोटा कारखान्यांना निश्चित करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान सोमेश्वर कारखान्याची गाळप क्षमता 8500 टन प्रतिदिन इतकी होणार आहे. त्यामुळं 36 मेगावॅटपर्यंत सहवीज निर्मिती प्रकल्पाची विस्तारवाढ गरजेची आहे. महत्वाची बाब म्हणजे बारामतीत सोमेश्वरपेक्षा माळेगावची रिकव्हरी थोडी जास्त आहे. तसेच माळेगावनं गेटकेन व सभासदांना वेगवेगळा दर दिला. तर सोमेश्वरनं एकसारखा दर दिला. त्यामुळे रिकव्हरीत सुधारणा होण्यासाठी नोंदीनुसारच ऊस गाळपाला आणावा. पण त्यासाठी वशिलेबाजी नसली पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवारांनी मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किंमती, खाद्यतेलाचे दरही उंचावले