
Maharashtra Mansoon । यावर्षी एल निनो प्रभाव आणि बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यात (Maharashtra Mansoon) पेरण्याही पावसामुळे रखडल्या आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस तळकोकणात (Kokan) आला असला तरी तो राज्यातून गायब झाला आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता राज्यात २६ जूननंतर मान्सून सक्रिय होणार आहे. (Latest Marathi News)
हवामान शास्त्रज्ञांच्या मतानुसार, खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी (Maharashtra Mansoon Update) आणखी एक आठवड्याचा कालावधी लागेल. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे जर पाऊस जर पडलाच नाही तर पेरलेले उगवेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. निम्मा जून महिना संपत आला तरी पाऊस न पडल्याने हवामान खात्याने (IMD) शेतकऱ्यांना पेरण्या न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
‘अर्धवटराव, मी काय म्हणालो, ते पूर्ण ऐकलेच नाही…, फडणवीसांची ठाकरेंवर जहरी टीका
दरम्यान, आता हवामान विभागाकडून पावसासंदर्भात मोठी अपडेट देण्यात आली आहे. राज्यात २६ जूननंतर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे, पाऊस रखडल्याने राज्यातील अनेक धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे.
Instagram वर मैत्री झाली, प्रेमही झालं; हॉटेलवर बोलवलं अन् घडलं धक्कादायक; घटना वाचून हादराल