शेतकऱ्यांना मोठा फटका; टोमॅटोच्या दरात घसरण

Farmers hit hard; Fall in tomato prices

शेतीला प्रत्येकवेळी निसर्ग साथ देईल असे नसते. नैसर्गिक संकटांमुळे अनेकदा शेतीचे नुकसान होते. अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना बसलेला आर्थिक फटका अजून भरून काढता आलेला नाही. अशातच आता टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे.

बारामती तालुक्यात ऊसतोड कामगाराच्या ३ वर्षीय चीमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला…

बाजारपेठेत वाढलेले टोमॅटोचे दर अचानक कमी झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. सध्या टोमॅटोचा भाव (Tomato rates) 50 ते 100 रुपये प्रति कॅरेट झाल्याने, टोमॅटोला उतरती कळा लागली आहे. दिवाळीनंतर बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढली.मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला. याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे.

मोठी बातमी! सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

नाशिक, मुंबई, गुजरात, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंगलोर व यांशिवाय इतर बाजारपेठांमध्ये देखील टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. ऐन उत्पादन वाढीच्या काळात पिकाला दर न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

बिग ब्रेकिंग! मंत्रालयामध्ये तरुणाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न; नेमकं काय असेल कारण?

टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. पीक लावण्यापासून ते बाजारात येईपर्यंत शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे जातात. (Production cost) परंतु, टोमॅटोचे दर ढासळ्याने शेतकऱ्यांचा हा खर्च देखील भरून निघत नाहीये.

“राहुल गांधींचा विचार गाडल्याशिवाय राहणार नाही” – देवेंद्र फडणवीस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *