Business Idea । आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेकजण नोकरी (Job) करतात. परंतु नोकरीत पाहिजे तशी कमाई होत नाही. त्यामुळे अनेकजण नोकरीसोडून व्यवसाय (Business) करतात. परंतु जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यापूर्वी तुम्हाला त्या व्यवसायासंबंधित सर्व माहिती असावी. जर तुम्हाला त्याबाबदल कोणतीही माहिती नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. (Latest Marathi News)
Bigg Boss OTT 2 विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ लाख रुपये बक्षीस; वाचून बसेल धक्का
जर तुम्ही आता शेतीसंबंधीत कांदा डिहायड्रेशन व्यवसाय (Onion dehydration business) सुरु केला तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. जर तुमच्याकडे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायाला (Onion dehydration) बाजारात खूप मागणी आहे. जाणून घ्या या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती.
Agricultural News । दुष्काळ जाहीर करून आर्थिक भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची मागणी
काय आहे हा व्यवसाय?
वाळवणे असा डिहाड्रेशनचा अर्थ होतो. या प्रक्रियेत कांद्याचे लहान लहान तुकडे करून त्यांना उन्हामध्ये किंवा डिहाड्रेशन मशीनमध्ये वाळवले जातात. त्यानंतर या तुकड्यांवर किंवा त्या तुकड्यांची पावडर तयार करून बाजारात चांगल्या किमतीला विक्री करण्यात येते. तुम्हीही आता हा व्यवसाय सुरु करू शकता.
ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘त्या’ 5 खासदारांवर होणार कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
गुंतवणूक
गुंतवणुकीचा विचार केला तर यात तुम्हाला एकूण 1,50,000 लाख रुपये ते 5,00,000 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. विशेष म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला जास्त मनुष्यबळाची गरज पडणार नाही. या व्यवसायासाठी तुम्हाला 65000 रुपये किमतीचे सोलर ड्रायर मशीन, 8000 रुपये किमतीचे ग्राइंडर मशीन आणि 1500 रुपये किमतीचे पॅकेजिंग मशीनची गरज पडणार आहे.
त्याशिवाय कांदा हा या उदयोगाचा मुख्य कच्चा माल असल्याने जर तुम्ही हा व्यवसाय कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रदेशात किंवा कांदा खरेदी विक्री केंद्राच्या जवळ सुरु केला तर तुमचा वाहतूकीचा खर्च कमी येऊ शकतो. तुम्हाला कांद्यासाठी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष करार करता येईल किंवा तुम्हाला तालुका बाजार समितीतून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा सहज खरेदी करता येईल.
Havaman Andaj । राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार? पावसासाठी पोषक वातावरण तयार
तुम्ही हा माल मसाले तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये विक्री करू शकता. हॉटेलमध्ये या उत्पादनाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर हा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.
Onion Market Price । शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ‘या’ ठिकाणी कांद्याला मिळाला सर्वोच्च भाव
हे ही पहा