![Farmers in 'Ya' district will have to give advance notice of damage within 72 hours](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/09/Nagar-1024x538.jpg)
मुंबई : सध्याच्या परिस्थितीत म्हणजेच सप्टेंबर महिन्यातही नगर (Nagar) जिल्ह्यात मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. दरम्यान हा मुसळधार पाऊस पिकांचे नुकसान (Damage to crops) करू लागला आहे. आत्ता आतापर्यंत नगर जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop Insurance) घेतला आहे. परंतु या शेतकऱ्यांनी (Farmers) आता विमा कंपनीकडे तक्रारी सुरू केल्या आहे. कंपनीकडून कृषी विभागाच्या मदतीने या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येत आहे.
सोने-चांदी खरेदी करताय? किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर
कृषी विभागाने महत्वाचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, त्यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही अट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
अशी द्या पीक नुकसानीची माहिती:
क्रॉप इन्शुुरन्स ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या ऍपद्वारे पीक नुकसानीची माहिती देता येईल. तसेच पीक नुकसानीची माहिती एचडीएफसी इर्गो कंपनीच्या 18002660700 या टोल फ्री क्रमांकावरही देता येईल. महत्वाचं म्हणजे विमा कंपनीने तालुका पातळीवर प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, या प्रतिनिधींनाही माहिती देता येईल.तसेच तुम्ही नुकसानीची पूर्वसूचना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन देता येईल. विमा कंपनीच्या 7304524888 या व्हॉट्सऍप क्रमांकावरही पीक नुकसानीची माहिती देता येईल.
Herbs For Joint Pain: गुडघेदुखीने त्रस्त आहात? अवश्य वापरा या औषधी वनस्पती, मिळेल आराम