दौंड तालुक्यातील लिंगाळी येथील संभाजी काटे या शेतकऱ्याने मुरमाड शेतीमध्ये गुलाबशेती पिकवली आहे. संभाजी काटे या शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मुरमाड जमिनीमध्ये गुलाब शेती फुलविली आहे. संभाजी काटे या गुलाब उत्पादनातून वर्षाकाठी जवळपास ४ लाख रुपये कमवतात. त्यामध्ये खर्च वजा करून त्यांना वर्षाला ३ लाख रुपये नफा शिल्लक राहतो.
ऊसतोड मजुराची एक मुलगी बनली इंजिनियर तर दोन मुली बनणार डॉक्टर; वाचा सविस्तर
त्यांच्याकडे एकूण ३ एकर शेती असून ते एका एकरमध्ये गुलाब शेती करतात. गुलाबाच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीस ते चाळीस दिवसात फुले लागतात व साधारण पाच महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते.
तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत खडकी शाळेची चमकदार ‘कामगिरी’
गुलाबाच्या फुलांची दररोज शेकडा २०० रु प्रमाणे ५०० रुपयांची विक्री होते. गुलाबाच्या इतर कोणत्या वाणापेक्षा ग्लॅडीएटर या वाणाला चांगला रंग व वाणामुळे आकर्षणामुळे बाजारपेठेत चांगली मागणी मिळते. असे संभाजी काटे यांनी यावेळी सांगितले.
एकाच व्यासपीठावर शंभुराज देसाईंच्या कानात सुप्रिया सुळेंनी केली कुजबुज