खडकवासला धरण हे काही धरणांमधील एक महत्त्वपूर्ण धरण आहे. खडकवासला धरण हे पुणे शहरांबरोबरच शेजारील जिल्ह्यांना व तालुक्यांना देखील पाणीपुरवठा करत असते. या धरणाच्या पाण्यावरती अनेक शेतकरी अवलंबून असतात. मात्र गेल्या 25 दिवसांचा कालावधी लोटला असून इंदापूर (Indapur) तालुक्यात खडकवासला कालव्याचे पाणी आलेल नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
आशा भोसले यांनी अमृता फडणवीसांना दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाल्या, “व्हॉइस मॉड्युलेशन व सराव…”
पिके व गावांच्या पाणी योजना केवळ कालव्यावर अवलंबून असल्याने शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी नाहीये. त्यामुळे पिकांना धोका निर्मान झाला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी पाण्याची मागणी करत आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे ते तरंगवाडीपर्यंत अनेक गाव हे कालव्यावर अवलंबून असतात. गेल्यावर्षी धरणामध्ये पाणी असल्यामुळे पाणी टंचाई भासत नहव्ती. त्यामुळे या देखील वर्षी शेतकऱ्यांनी पीक पेरणी केली आहे. एप्रिल महिन्यामध्ये पाणी येईल का नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय
अनेकांच्या विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे पीक कसे जगावावे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खडकवासला प्रकल्पात सुमारे 13 टीएमसी अर्थात 47 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून दोन वेळा पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांचा कालावधीमध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी जलसंपदा विभागाने यापुढील काळात दोन वेळा पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भाजपविरोधात लढण्यासाठी महाआघाडीच्या हालचाली सुरु, शरद पवारांनी घेतली खर्गे आणि राहुल गांधींची भेट