‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कुसुम सोलर पंप, ‘असा’ करा अर्ज

Farmers of this district will get kusum solar pump, apply for this

राज्य सरकार (State government) शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. दरम्यान अशातच शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या (Irrigation problem) लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सिंचन शक्य व्हावं यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना (Pradhan Mantri Kusum Yojana PMKY) राबवली आहे. ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला (Maharashtra) 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 1 लाख सोलर पंप मिळणार आहेत. इतकंच नाही तर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाख सोलर पपं दिले जाणार आहेत. दरम्यान या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरु आहे.

जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती माहिती आहे का? 50 वर्षांपासून केली नव्हती अंघोळ; पाहा PHOTO

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सध्या महाराष्ट्रामध्ये दुसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे 52 हजार 750 पंपाचे इन्स्टोलेशन प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करणे गरजेच आहे. दरम्यान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड, पेमेंटचे ऑप्शन येत असतात. खरतर महाराष्ट्रामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये कोटा पूर्ण झाल्यामुळे नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. तर अजूनही 20 जिल्ह्यांमध्ये SC/ST Open प्रवर्गाचा कोठा उपलब्ध असल्याने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

खुशखबर! आता ‘या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार विना टिकिट मोफत प्रवास

‘या’ 14 जिल्ह्यांतील शेतकरी नोंदणी करू शकत नाही

महत्वाची बाब म्हणजे कुसुम सोलर पंपासाठी पुणे, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाडा विभागाचा खूप मोठा कल आहे. त्यामुळे औरंगाबाद, अहमदनगर, बीड, धुळे, हिंगोली, परभणी, सोलापूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, जळगाव, जालना, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आपली नोंदणी करता येत नाही कारण या 14 जिल्ह्यांचा कोठा संपला आहे.

मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, श्रीगोंद्याच्या ‘या’ गावांमध्ये केला अतिवृष्टी पाहणी दौरा

या 20 जिल्ह्यांमध्ये SC/ST Open प्रवर्गाचा कोठा उपलब्ध

या योजनेकरीता उर्वरित 20 जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध आहे. त्यामुळे आज देखील नोंदणी करता येत आहे. यामध्ये पुणे विभागातील SC/ST लाभार्थ्यांसाठी कोठा उपलब्ध आहे. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, सांगली, वर्धा, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये ST प्रवर्गासाठी कोठा उपलब्ध आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर जिल्ह्यातील ST प्रवर्गासाठी चा कोठा उपलब्ध आहे. तर पालघर, नागपूर, वाशिममध्ये SC / ST अशा दोन्ही प्रवर्गासाठी कोठा उपलब्ध आहे. इतकंच नाही तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी SC / ST Open प्रवर्गाचा कोठा उपलब्ध असून तुम्ही ठिकाणी नोंदणी करू शकता.

राजमाता दूध संकलन केंद्र बहिरोबावाडी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना साखर वाटप

विशेष म्हणजे कुसुम सोलर या योजनेसाठी केंद्र शासनाचे 30 टक्के अर्थसहाय्य (Subsidy) उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 10 टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 05 टक्के असणार आहे. तर उर्वरित 60/65 टक्के हिस्सा राज्य अशा निधीच्या प्रमाणात ही योजना राबविली जात आहे.

सौर कृषी पंप योजना 2022 ची आवश्यक कागदपत्रे :-

1) अर्जदाराचे आधार कार्ड
2) ओळखपत्र
3) पत्त्याचा पुरावा
4) शेतीची कागदपत्रे
5) बँक खाते पासबुक
6) मोबाईल नंबर
7) पासपोर्ट आकाराचा फोटो

श्री क्षेत्र म्हसोबाचीवाडी ग्रामदैवत यात्रा उत्सव आजपासून सुरु

असा करा अर्ज –

ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी सरकारच्या kusum.mahaurja.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *