Onion Rate । राज्यात काही दिवसांपासून कांद्याचे दर (Onion Price) कोसळले आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Govt) कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Export charges) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळू लागले आहेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तसेच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
Samrtphone Charging | तुम्हीही स्मार्टफोन 100% चार्ज करताय? तर थांबा, ही बातमी एकदा वाचाच
सरकारने निर्णय घेतलेला तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि शेतकऱ्यांनी राहुरी येथे नगर- मनमाड राज्य महामार्गावर झोपून चक्काजाम आंदोलन केले. परंतु हे आंदोलन चिघळले होते. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
Fire News । धक्कादायक! रेल्वेला भयानक आग, ८ प्रवासी ठार तर २० जखमी
कांद्याला सरसकट ३ हजार रुपये प्रतिकिंटल हमीभाव द्यावा. ३१ मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याला ३५० रुपये अनुदान त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशा वेगवेगळ्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत या मागण्या केल्या जात नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.
Electric Tractor । सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार
या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. सरकारकडून शेतकर्यांवर सतत अन्याय होत असून आता शेतकर्यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे त्यांनी शेतकर्यांचा अंत पाहू नये. नाहीतर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला.
Chandrayaan 3 । “तुमच्या कार्याला आणि धैर्याला सलाम”; नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा