बातमी कामाची! शेतकऱ्यांनो ‘या’ पद्धतीने ओळखा खतातील बनावटपणा; वाचा सविस्तर

आपला भारत देश (India) हा कृषिप्रधान (agricultural) देश म्हणून ओळखला जातो. भारतातील शेतकरी नैसर्गिक खते वापरुन (natural fertilizers) किंवा रासायनिक खते (chemical fertilizers)वापरुन शेती पिकवत असतात. पण अनेकदा शेतकर्‍याची फसवणुक केली जाते. शेतकर्‍यांना कधी तारीख संपूर्ण गेलेली खते दिला जात. तर कधी बनावट खते (artificial fertilizers) दिली जातात. आता शेतकऱ्यांनो टेंशन घेऊ नका आम्ही तुम्हाला खते असली आहेत कि बनावट हे कसं ओळखायच ते सांगणार आहोत.

डी अमोनियम फॉस्फेट (DAP)
पिकाची जोमदार वाढ आणि मजबुत प्रतिकार शक्ती निर्माण करून उत्पादन वाढीस मदत होण्यासाठी DAP वापरला जातो. पण हे बनावट आहे की असली हे शोधण्यासाठी तुम्ही डीपीचे दोन चार दाणे हातावर घेऊन त्याला तंबाखूला चुना लावल्यासारखे चोळा. हे दाणे चोळल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही असली डीपी आहे असे समजा. तसेच डीएपीचे दाणे मंद आचेवर तवा ठेवून त्यावर गरम केल्यास दाणे फुटले तर समजा की हे डीपी खरे आहे.

युरिया (urea)
युरियाचा वापर शेतकरी अधिक प्रमाणात करतात. युरिया वापरल्यामुळे मका पिकाची वाढ लवकरात लवकर होते. युरियाचा वापर केला की मका पिकावर हिरवा गार रंग चढततो. मकेचे कणीस मोठे होण्यासाठी युरिया उपयुक्त ठरतो. फळांची कॉलिटी सुधारण्यासाठी, फळांचे वजन वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी, चांगला रंग येण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. हाच युरिया पाण्यात टाकल्यानंतर पाणी थंड झाले तर हा युरिया असली आहे असे समजावे.

पोटॅश
पोटॅश हे खत मिठासारखे दिसणारे आहे. त्यातून ६०टक्के पोटॅश मिळते. द्राक्षे, फळझाडे, ऊस, बटाटा, टोमॅटो, काकडी,कांदा, कपाशी या पिकांना पोटॅशियमचा जास्त फायदा ठरतो. पण पोटॅशियम नक्की असली कसे असते हे तुम्हाला माहित आहे का? पोटॅशियमच्या काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर ते एकमेकांना चिकटतात. ते पोटॅशियम बनावट असते. पण पोटॅशियमच्या काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर ते विरघळून गेले. त्यानंतर पाण्याचा वरचा भाग लाल रंगाचा दिसत असेल तर ते असली पोटॅशियम आहे.

सुपर फास्फेट
जाड आणि बदामीची रंगाचे दाणे असतील तर ते सुपरफास्ट असते. सुपर फास्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर ते तडतड वाजून फुटतात. त्यावरून आपल्याला समजते की हे फुटलेले दाणे असली आहेत. सुपर फास्फेटचे दाणे निबर असतात त्यामुळे ते हाताने तुटत नाहीत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *