
शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार आल्यापासून सतत नवनवीन घोषणा व आश्वासने जाहीर केली जात आहेत. नुकतेच सोलापूर मधील बार्शी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मोठी बातमी! कापुस-सोयाबीन भावासाठी राजू शेट्टी उभारणार आंदोलन
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारने पंतप्रधान कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर फिडर या दोन महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Salman Khan: “देव मुंबई पोलिसांचे भले करो”! सलमान खानचे ट्विट चर्चेत
यामधील सौर फिडर योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु, नंतरच्या काळात ती बंद झाला. आता मात्र ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सगळे सोलर फिडरवर न्यायचे असा सरकारने निर्णय घेतला आहे. सोलर फिडरवर लावताना जागेची सर्वात मोठी अडचण होती. यासाठी सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार असून त्यासाठी प्रत्येक हेक्टरी 75 हजार रुपये प्रति महिना प्रमाणे शेतकऱ्यांना भाडे दिले जाणार आहे.
“टिकल्या लावलेल्या मुलींकडे मुलं बघत नाहीत…”, मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
” येत्या काळात शेतकऱ्यांसाठी आणखी योजना करायच्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या योजनेसाठी 350 कोटी रुपयांची निविदा काढणार आहोत” अशी घोषणा देखील या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“Activa स्कुटीच्या पुढच्या भागामध्ये कोब्रा नागाने केले घर; पाहा व्हायरल VIDEO