मागच्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज (Electricity) मिळावी हा विषय चर्चेत आहे. या मागणीसाठी बऱ्यचदा आंदोलने देखील झाली आहेत. तरीही अजून हा प्रश्न काही मिटला नाही. यामुळे आता यासाठी ठाकरे गटाची युवासेना (youth army) मैदानात उतरली आहे. ठाकरे (Thackeray) गटाच्या युवा सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त संजय राऊत भावूक; जुना फोटो शेअर करत म्हणाले…
शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या थंडीचे (cold) प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाहीतर काही शेतकरी दिवसभर काम करतात आणि रात्री देखील शेतातच काम करावं लागत आहे. तसेच जंगली जनावरे, साप, अनेक वेगवेगळे किडे यांचे शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने चालू ठेवल्यास संघर्ष होणार; राजू शेट्टींचा गंभीर इशारा
त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा विचार करावा आणि लवकरात लवकर शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे (Ganesh Ingle) यांनी दिलाय. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले असून आता शेतकरी संघटना देखील आंदोलने करत आहेत.