परभणी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसामुळे (the return rain) शेतकऱ्यांच्या (farmers) खरीप पिकांची नासाडी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन (Soyabean) आणि कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी पक्षाच्या चिन्हांतच व्यस्त असल्याचा आरोप परभणीच्या शेतकऱ्यांनी केला आहे. हा आरोप करताना शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात अर्धनग्न (half naked) होऊन आंदोलन (agitation) केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
India: भारताची स्थिती भूकेच्या बाबतीत पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही गंभीर, वाचा सविस्तर
शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साठल्याने सोयाबीन खराब झाले आहे. या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी सरकारच लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या शेतामध्ये अर्धनग्न होत अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. इतकंच नाही तर पीक विमा आणि सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मनाला सुन्न करणारी घटना, रुग्णालयाच्या छतावर सापडले 500 मृतदेह; शरीराचे अवयवही झाले गायब
शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना सांगितले की,” सोयाबीनची शेती पाण्याखाली गेली आहे. या कृषी प्रधान देशात असे सांगितले जाते की शेतकरी हा राजा आहे. परंतु हा राजा फक्त नावाला केला आहे. पण या राजाचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेने हिरावला आहे. त्यामुळे आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन टप्प्यात वितरित होणार चार हजार कोटी रुपये, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
पुढे शेतकरी आंदोलन करताना म्हणाले की, आज शेतकऱ्यांची भयानक स्थिती आहे. आमच्या सोयाबीन पिकाच्या कापणीची वेळ आली असताना पावसाने पिकांची खराबी केली आहे. मग आता आमची दिवाळी कशी होणार? कारण शासन चिन्हात परेशान आहे. त्यामुळे सरकारच आमच्याकडे लक्ष नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला त्वरीत मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अमूल दूध दरात प्रतीलिटर ‘इतक्या’ रूपयांनी वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका!