आजकाल नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त आर्थिक फायदा होतो. नोकरीमध्ये कामाचे जास्त तास व कमी मोबदला यामुळे लोकांचा कल व्यवसायाकडे वाढत आहे. कोरोनानंतर तर यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय ( Buisness for farmers) करताना पहायला मिळत आहेत. यामध्ये दुग्धव्यवसायाचा ( Dairyfarming) समावेश आहे. यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. दिवसेंदिवस दुग्ध व्यवसायात वाढ होताना आपण पाहत आहोत. अशातच आता तुम्ही पशुखाद्य बनविण्याचा देखील व्यवसाय सुरु करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला जो योग्य पद्धतीने धडा शिकवेल त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप
पशुखाद्य व्यवसाय कमी वेळेत व कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणारा आहे. पशुपालकांना आपल्या जनावरांच्या खाद्यासाठी कायम चाऱ्याची गरज असते. त्यामुळे पशुखाद्य बनविण्याचा व्यवसाय बाराही महिने जोरात चालू शकतो. यामध्ये मक्याची भुशी, गव्हाची भुशी, तृणधान्याची भुशी, गवत यांचा वापर करून पशुखाद्य बनवता येऊ शकते. यासाठी फार शिक्षणाची गरज नसून फक्त कामात सातत्य ठेवण्याची आवश्यकता असते.
एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न करणाऱ्या तरुणाबाबत भयानक सत्य समोर; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
पशुखाद्य व्यवसाय सुरू करताना परवाना काढणे मात्र महत्त्वाचे आहे. पुढे जाऊन व्यवसाय मोठा करायचा असेल तर परवाना गरजेचा असतो. त्यामुळे यासाठी परवाना काढावा लागतो. परवाना काढण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
1) परवाना काढताना सर्वात आधी तुम्हाला तुमच्या चारा फार्म चे नाव निवडावे लागेल
2) यानंतर खरेदी कायद्यात नावाची नोंदणी करावी लागेल.
3) नोंदणीनंतर मात्र FSSAI कडून फूड लायसन्स घ्यावे लागेल.
4) सरकारला कर भरण्यासाठी GST नोंद देखील करावी लागेल.
5) पशुखाद्य मशीनसाठी पर्यावरण विभागाकडून एनओसी घेणे आवश्यक आहे.
6) या व्यवसायासाठी ISI च्या मानकानुसार, BIS प्रमाणपत्र देखील करावे लागेल.
कांद्याला भाव नसल्याने संतापून शेतकऱ्याने कांद्यावरच काढले नरेंद्र मोदींच चित्र