मुंबई : “माझा एक दिवस बळीराजासाठी “या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधून सुरुवात झाली. दरम्यान याच उपक्रमांतर्गत राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार (Abdul Sattar) हे मेळघाट दौऱ्यावर आहेत. सत्तार दौऱ्यावर असतानाच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील लाकटू या गावात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आहे.
Abdul Sattar: “ये मीठा है और वो कडू है..” , मेळघाट दौऱ्यावर अब्दुल सत्तारांची विरोधकांवर फटकेबाजी
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव अनिल सुरजलाल ठाकरे असं आहे. 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे.तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कमदेखील मिळालेली नाही.याच चिंतेत अनिल ठाकरे होते. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
खुशखबर! एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवीन दर
ये मीठा है और वो कडू है
खास करून दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अब्दुल सत्तार या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान या दौऱ्यात सत्तारांनी एक वक्तव्य केलय ते खूप गाजतंय. ते म्हणजे … ये मीठा है और वो कडू है..आता प्रश्न पडला असेल की हा टोला कोणाला मारला.तर सत्तार यांनी हसत हसतच बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) निशाणा साधला.