अहमदनगर : राज्यात सध्या पडणाऱ्या परतीच्या पावसाने (the return rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यामुळे शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांकडून (Farmers) सरकारने (government) या नुकसानीचे पंचनामे (Panchnama) करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. परंतु शेतकऱ्यांकडूनच आता पिकांच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चक्क एकेरी चारशे रुपयांची मागणी (demand) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Instagram: बिग ब्रेकिंग! इंस्टाग्रामचे अकाउंट होतंय अचानक सस्पेंड
हा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामध्ये (nevasa Taluka) घडला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रकार नेमका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्याच जिल्ह्यात घडला आहे .त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं आहे. नेवासे तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने सोयाबीन पिकासह इतर अनेक पिकांचेदेखील अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनीकाही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाहणी दौरा पूर्ण केला होता.
दरम्यान हा दौरा केल्यानंतरच असा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. घडल असं की, एक पथक पंचनामा करण्यासाठी नेवासे तालुक्यामध्ये गेले होते. दरम्यान त्या ठिकाणी त्यांनी संबंधित शेतकऱ्याला एकरी चारशे रुपये पैसे देण्यास सांगितले. मात्र संबंधित शेतकऱ्याने त्याचा विरोध केला. या सर्व बाबींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला असून सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाला आहे. पीक पाहणी दौऱ्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या होत्या.
मोठी बातमी! इंदापूरमध्ये माजी खासदार राजू शेट्टींच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबरला ऊस परिषद
इतकंच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.परंतु असं असलं तरी शेतकऱ्यांकडून एकेरी चारशे रुपये घेतल्याच्या प्रकारामुळे शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. याच मूळ कारण म्हणजे आधी अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं न भरून निघणार नुकसान केलं आहे.आणि त्यात आणखी भर म्हणून राज्यातील अनेक भागात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासुन वंचित आहेत.दरम्यान पैसे मागण्याच्या प्रवृत्तींवर आता महसूलमंत्री विखे पाटील आणि प्रशासन काेणती कारवाई करणार याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.
न्यायालयाचा मोठा निर्णय! पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही करू शकता व्हिडीओ रेकॉर्डिंग