शेतकरी सुद्धा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Farmers will also go to the fields by helicopter! Chief Minister Eknath Shinde's announcement

नागपूर ( Nagpur) येथे सुरू असलेलं यंदाच हिवाळी अधिवेशन विविध कारणांनी गाजत आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात तुफान टोलेबाजी यामध्ये होत आहे. दरम्यान अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री कसा फिरतो ? असे म्हणत हिनवण्यात आले होते. यावर उत्तर देताना शिंदे यांनी आता शेतकरी सुद्धा हेलिकॉप्टरने शेतात जाणार असल्याचे सांगितले आहे.

पंतला अपघातापासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले ‘हे’ बक्षीस

अधिवेशनात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde) यांनी शिंदे- फडणवीस सरकारने केलेल्या कामांबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्र ( Maharashtra) हे दिव्यांगांसाठी मंत्रालय करणारे पहिले राज्य आहे. तसेच राज्यात दिवाळीमध्ये जवळपास सात कोटी लोकांना रेशनचे शिधावाटप केले आहे. एवढेच नाही तर धान्य उत्पादकांसाठी हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर केला गेला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून पाच कोटींची मदत करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला म्हाताऱ्यांची तुफान गर्दी; खुर्च्या, बॅरिकेट्स तोडून केला डान्स

दरम्यान अगामी काळात राज्यात आणखी कोणत्या उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत याबद्दल देखील शिंदे यांनी माहिती दिली आहे. यामध्ये राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे रुग्णालये सुरू होणार असल्याबाबत व 75 हजार शासकीय नोकऱ्या दिल्या जाणार असल्याबाबत सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार ही योजना नव्याने सुरू होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एअर ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अगामी काळात यासाठी तालुक्याच्या ठिकाणी हॅलिपॅड तयार करण्यात येणार आहे.

कंगनाचे घर पाडण्यासाठी मविआ कडून लाखोंची लाच; एकनाथ शिंदे यांचा खुलासा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *