मागच्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू, द्राक्षे, केळी, याचबरोबर शेतकऱ्यांच्या अजून बऱ्याच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये (Nanded) वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पाहणी केली आहे.
अमृता फडणवीस यांचं शिक्षण किती झालं आहे? आईवडील काय काम करतात? जाणून घ्या याबद्दल माहिती
गिरीश महाजन हे आज मुदखेड तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात सर्व अधिकाऱ्यांना घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. मुदखेड तालुक्यातील कलिंगड (Watermelon), केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आमचं सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिल आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
वडिलांच्या निधनानंतर मी गायी विकून एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
पाऊसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान –
राज्यासह नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा त्याचबरोबर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये गारपीठ झाल्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे केळी बागांचं झाल आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
‘चांगला पगार असून देखील आनंद मिळत नाही’ म्हणून इंजिनिअर तरुणाने केली आत्महत्या