Government Scheme । आजकाल तरुण नोकरीच्या मागे न लागता छोट्या-मोठ्या व्यवसायाकडे (Business) वळू लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर हे व्यवसाय (Business Idea) बाजाराची संपूर्ण माहिती घेऊन सुरु केले तर लाखो रुपयांची कमाई करता येते. अनेकजण शेतीसोबत कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मेंढी पालन यांसारखे व्यवसाय करतात. आता तुम्हीही हे शेती पूरक व्यवसाय सुरु करू शकता. (Latest Marathi News)
Onion Rate । कांदा निर्यातीवरून शेतकरी संघटना आक्रमक! चक्काजाम आंदोलन करत केली ‘ही’ मागणी
जर तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकार मदत करेल. या मदतीचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. शेती पूरक व्यवसायांसाठी सरकार अनुदान देत आहे. या योजनेचे नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान. व्यवसायासाठी याचा फायदा तुम्हाला होईल. (Government Subsidy)
Samrtphone Charging | तुम्हीही स्मार्टफोन 100% चार्ज करताय? तर थांबा, ही बातमी एकदा वाचाच
मिळेल 50 लाखांची मदत
या अंतर्गत तुम्हाला कुकुट पालन, मेंढी पालन, शेळी, पशुखाद्य, वैरण, बियाणे तसेच मुरघास निर्मिती यांसारख्या व्यवसायांकरिता कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे. याच्या माध्यमातून शेतकरी उद्योजक बनू शकतील. केंद्र सरकारने 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित केल्या आहेत. त्यानुसार सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे.
Fire News । धक्कादायक! रेल्वेला भयानक आग, ८ प्रवासी ठार तर २० जखमी
कोणाला करता येईल अर्ज?
सहकारी दूध उत्पादक संस्था,व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता बचत गट, शेतकरी सहकारी संस्था, खाजगी संस्था आणि स्टार्टअप ग्रुप यांना याचा लाभ मिळेल.
Electric Tractor । सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार
कुठे करावा अर्ज?
जर तुम्हाला या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
Chandrayaan 3 । “तुमच्या कार्याला आणि धैर्याला सलाम”; नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा
आवश्यक कागदपत्रे
- प्रकल्प अहवाल
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- विज बिलाची प्रत