भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशाची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. यासाठी सरकार शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सरकारने आतापर्यंत विविध योजना देखील राबविल्या आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकारने ( Government) पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.
देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!
सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पीकस्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची निवड केली जाते. यानंतर या शेतकऱ्यांना रोख रक्कम व पारितोषिक वितरित केले जाते. कृषी विभागाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या स्तरानुसार बक्षीस दिले जाते. तालुकास्तरासाठी 5000, जिल्हा स्तरासाठी 10,000 व राज्य स्तरासाठी 50,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका
या पीकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले आहे. यासाठी 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ( Agricultural Officer) हा अर्ज करायचा आहे. पीक स्पर्धेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे अनिवार्य आहे. तसेच ती शेतजमीन तो स्वतः कसत असणे गरजेचे आहे.
मोबाईलवर पॉर्न व्हिडिओज पाहताय तर सावधान! यांच लक्ष तुमच्यावर असतं…