शेतकरी शेतात घाम गाळून कष्ट करतात. निसर्गाने साथ दिलीच तर चांगले उत्पादन देखील काढतात. परंतु, जेव्हा मोबदला घेण्याची वेळ येते तेव्हा सगळी चक्र उलटी फिरतात. सध्या कांद्याच्या बाबतीत तसे झाले आहे. कांद्याचे दर बाजारात चांगलेच पडले असून 8 ते 13 रुपये प्रतिकिलो दराने कांदा ( Onion Rates) विकला जातोय. यामुळे मुळातच तिखट असलेल्या कांद्याने दरात खाली उतरुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांसह केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता, तरीही का पेटतोय सीमावाद?
बाजारात कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. 8 ते 13 रुपये प्रतिकिलो वर आलेल्या कांद्याच्या गोनीमागे शेतकऱ्यांना फार फार तर पाचशे ते सहाशे रुपये मिळत आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. त्यात दुसरी महत्त्वाची आणि शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी गोष्ट म्हणजे परराज्यातून कांद्याची आवक ( Import) वाढली असल्याने इतक्यात दर उचलले जातील अशी शक्यता देखील नाहीय.
बारामतीतील बालसुधार गृहातील मुलाचे स्पर्धा परीक्षेत यश; स्वतःच्या हिंमतीवर झाला अधिकारी
कांद्याच्या पिकाला बाजारापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक भांडवल गुंतवावे लागलेले असते. तसेच यासाठी त्यांनी जास्तीचे शारीरिक कष्ट देखील केलेले असते. अशातच कांद्यांचे दर पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आपण केलेल्या कष्टाची किंमत कवडीमोल होताना पाहणे हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे बाजारपेठांमध्ये नव्या कांद्याला मागणी वाढल्यामुळे जुना कांदा तर घरीच सडून जाण्याच्या मार्गावर आलाय.