Onion Rate: कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत! वाचा सविस्त बातमी

Farmers worried due to fall in onion prices! Read the latest news

मुंबई : गेल्या चार महिन्यापासून कांद्याचे (Onion) भाव काय वाढताना दिसत नाहीयेत त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. बाजारपेठेतील घटती मागणी आणि कांद्याचे वाढते उत्पादन यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याला 15 रुपये किलोपेक्षा जास्त दर मिळालेला नाही.

महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांवर फक्त 6 ते 14 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आलीये. मध्यंतरी नाफेडने अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला होता. पण आता हाच कांदा पु्न्हा बाजारात दाखल होत असल्याने कांद्याचे दर कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणारा उन्हाळा कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी वखारीमध्ये ठेवला होता. चांगला भाव मिळेल यामुळे शेतकऱ्यांनी कांदा वखारीमध्ये ठेवलाय. पण पावसामुळे या कांदा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एवढ्या दिवस कांदा साठवूनही देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने केंद्र व राज्य सरकारने कांद्याला किलोला 10 रुपये अनुदान तसेच निर्यातील प्रोत्साहन देण्याची मागणी जोर धरू लागलीये.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *