शेती तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. यामुळे बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच इतर पिकांचे देखील उत्पादन घेत आहेत. यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा देखील होत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर मधील हिंगोणी येथील एका तरुण शेतकऱ्याने तर विलायती केळीची लागवड ( Banana Farming) करून 15 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. विशेष म्हणजे युट्युबच्या माध्यमातून माहिती घेऊन या तरुणाने केळी लागवडीचे तंत्र अवगत केले आहे.
खळबळजनक! घरात बसलेल्या आलिया भट्टचे दोघांनी गुपचूप काढले प्रायव्हेट फोटो
कुंदन पाटील ( Kundan Patil) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. विलायती केळीला शहरांमध्ये असलेली वाढती मागणी पाहून कुंदन पाटील यांनी अडीज एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 3000 केळीची झाडे लावली आहेत. या केळीची पहिली तोडणी झाली असून या तोडणीला 4800 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. यातून कुंदन पाटील यांनी लाखो रुपयांचे उत्पादन काढले आहे.
कैद्यांना मिळणार सुखाची झोप, तुरूंगात मिळणार बेड आणि उशी
खरंतर वीलायती केळी हे आंध्रप्रदेशमध्ये घेतले जाणारे पीक आहे. परंतु यावर्षी याभागात केळीची फारशी लागवड झालेली नाही. यामुळे सध्या या केळीला प्रचंड मागणी आहे. याचाच फायदा कुंदन पाटील यांना होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, इतर शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीत असेच वेगवेगळे प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवावे.
मोठी बातमी! अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ शाखेतील विद्यार्थीदेखील करू शकणार अर्ज