शेती हा मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय आहे. देशात ग्रामीण भागात प्रामुख्याने हाच व्यवसाय केला जातो. परंतु, शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. यामुळे शेतीमधून फारसे आर्थिल उत्पन्न मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ( Rahuri) येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शेतीला जोडव्यवसायाची साथ हवी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
शिवाजी महाराजांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा अधिवेशनात अपमान; बोलायला गेले आणि…
राहुरी येथील कृषिविद्यापीठाच्या ‘महाअँग्रीव्हिजन 2022’ ( Maha Agrivision 2022) च्या तिसऱ्या क्षेत्रीय उद्घाटनास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. ‘नैसर्गिक व सेंद्रिय शेती : जागतिक परिपेक्ष व कृषी उद्योजकता’ असा या संमेलनाचा विषय आहे. यावेळी राज्यपालांनी कृषीमध्ये आधुनिक आणि प्राचीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाणे आवश्यक आहे. तसेच शेतीमध्ये दुग्धव्यवसाय व शेतीशी निगडित व्यवसाय केल्यास कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनणे शक्य आहे. असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsinh Koshyari) यांनी जोडव्यवसायाचे महत्त्व पटवून दिले आहे.
महाराष्ट्रातील पोरांच्या स्वप्नांचा चुराडा केला – रोहित पवार
याशिवाय जीआय टॅगिंग सारख्या बाबींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अधिक भाव मिळू शकतो. याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे शेतीमध्ये आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करायला हवा. कधी काळी देशाला बाहेरील देशाकडून अन्नधान्य घ्यावे लागत होते. परंतु, आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. आपण कृषीचे विद्यार्थी असल्याचा अभिमान बाळगा व धरणीमातेचे ऋण अदा करा असा सल्ला देखील यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे.
“…म्हणून तेथे भाजपची सत्ता”; गुजरात निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य