अपघातांच्या घटना कायम आपल्या आजूबाजूला घडत असतात. नुकताच पुणे येथे नवले पुलावर कंटेनरच्या धडकेने मोठा अपघात झाला होताच. काल ( दि.24) लातूर येथे देखील डिझेल टँकर व ट्रॅक्टरच्या धडकेत भीषण अपघात (Danger Accident) झाला आहे. या अपघातात एक जण मृत्यू झाला असून 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या मोठ्या अपघातामुळे लातूर-नांदेड मार्गावरील ( Latur-Nandes Highway) वाहतूक काही काळासाठी थांबली होती.
“निकाल लावलाच पाहिजे…”, कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी मार्गावर ही घटना घडली आहे. रात्री 10 च्या सुमारास या ठिकणी एका डिझेलची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला. यामध्ये डिझेलची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जागीच पेट घेतला. ही आग पुढे पसरत जाऊन रस्त्यावरील 7 वाहने जळून खाक झाली. यामध्ये एका एसटी बसचा देखील समावेश आहे. जवळजवळ एक तास हा अग्नीतांडव लातूर-नांदेड मार्गावर सुरू होता.
पोलीस भरतीच्या पुढच्या प्रक्रियेला स्टार्टर; मैदानी चाचणीसाठी उमेदवार लवकरच मैदानात
हा अपघात होताच पोलिस प्रशासन व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जखमी लोकांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले. या गंभीर व भीषण अपघाताने उपस्थित हादरून गेले होते. आग आटोक्यात यायला उशीर लागल्याने लातूर-नांदेड महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.
मोठी बातमी! आता न्यायालयच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची हकालपट्टी करणार?