सध्या अपघातांचे (Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज आपल्या कानावर एक ना एक अपघात झाल्याची माहिती ऐकायला येत आहे. सध्या अशीच अपघाताची धक्कादायक घटना नगर दौंड महामार्गावर (Nagar Daund Highway) विसापूर फाटा जवळ हॉटेल फौजीच्या समोर घडली आहे.
Viral video| दारू पिणाऱ्या माणसांचा हा स्ट्रगल तुम्ही पाहिलाय का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंडवरुन नगरला जाणाऱ्या इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात समोरून येणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन जण ठार झाले असून दोघे जखमी अवस्थेत आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
थेट ऊसवाहतूकदारांना चोप देण्याचा इशारा; अपघात टाळण्यासाठी ‘या’ गावाची अनोखी शक्कल
दरम्यान, नगर दौंड महामार्गावर अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. या ठिकाणी सतत अपधात होत असतात. भरगाव वेगाने जाणारी वाहने, ओव्हरटेक करताना होणारा निष्काळजीपणा, गाडीवर नियंत्रण नसणे, मोठ्या वजनाच्या गाड्या सुसाट वेगाने चालविणे, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांच्यामुळे अपघाताचे प्रमाण या महामार्गावर वाढल्याचे दिसत आहे.
बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; दोन दिवसांपासून येत आहेत मेसेज