अपघाताच्या घटना सतत कुठे ना कुठे घडत आहेत. सावधानता न बाळगल्यामुळे बरेच अपघात घडत असतात. तसेच चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने देखील मोठे अपघात घडत असतात. सध्या देखील अपघाताची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे सुरत – खरगोन बसचा भीषण अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. (Surat-Khargone bus accident at Shahada in Nandurbar district)
बारामतीमधल्या शेतकऱ्याची कमाल! आल्याच्या शेतीतून कमावले लाखो रुपये…
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकली आणि पलटी झाली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. आता जखमी झालेल्या लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
“मी नवऱ्याला सोडेल, पण आयुष्यात ‘या’ व्यक्तीला कधीच सोडणार नाही”; गौतमीने केला मोठा खुलासा
या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली. उलटलेल्या बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जाईल