Accident News । सातारा : देशात वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक केले आहेत. तरीही मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. एखादे जनावर आडवे आल्याने किंवा वाहन चालकांच्या चुकीमुळे या अपघातात (Accident) अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. काहींना कायमचे अपंगत्व येत आहे. अपघातांमुळे कित्येक संसार उध्वस्त होत आहेत. सध्या असाच एक अपघात बसचा झाला आहे. (Latest Marathi News)
सर्वात मोठी बातमी! लवकरच काँग्रेस पक्ष फुटणार, भाजपच्या बड्या खासदाराचा खळबळजनक दावा
मिळालेल्या माहितीनुसार, एक बस पुण्यावरून महाबळेश्वरच्या दिशेने निघाली होती. या बसचा पसरणी घाटात अवघड वळणावर अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस घाटात मागच्या दिशेला पाठीमागून येत असणाऱ्या एका दुचाकी स्वाराच्या अंगावर गेली. दुचाकीवरील एका महिलेसह अन्य २ जण बसखाली आले. परंतु या दुर्घटनेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. (Satara Accident News)
महत्त्वाचे म्हणजे ब्रेक फेल झालेली बस कठड्यात अडकली. त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. दरम्यान, या अपघाताचा पोलिसांकडून पंचनामा झाला असून अधिक तपास सुरु आहे.