बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ७ जण जागीच ठार तर ४० हून अधिक जखमी

Fatal bus and truck accident; 7 people were killed on the spot and more than 40 injured

सध्या अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येमध्ये ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल पहिल्यांदाच मनातलं बोलून दाखवलं; म्हणाले, “२०२४ ची कशाला वाट पाहू, आत्ताच…”

हा अपघात एवढा भयंकर होती की ट्रक उलटून बसच्या वर पडला. त्यामुळे बसचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

पुण्यात अजित पवारांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये लखनऊ-गोरखपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्याची माहिती दिली आहे.

मोठी बातमी! गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा; राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *