समृद्धी महामार्गावर (Highway) सतत अपघात घडत आहेत. या ठिकाणी अपघाताच्या (Accident) घटना काही कमी होत नाहीत. दरम्यान, आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भयानक अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये 2 लहान मुलांसह 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मोठी बातमी! अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईच निधन
सूत्रांच्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर सिंदखेडरा या ठिकाणी मारुती सुझुकी आर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. कार पलटी होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारचा अक्षरश चुरा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार निम्म्या किमतीत वीज