Samruddhi Mahamarg । समृद्धी महामार्ग अपघाताचे केंद्र बनले आहे. (Samruddhi Mahamarg Accident) हा महामार्ग झाल्यापासून तो सतत चर्चेचा विषय बनत आहे. कारण सतत या ठिकाणी अपघात घडत असतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Latest marathi news)
कार चालकाचा ताबा सुटून गाडी डिव्हायडरला जाऊन आदळली आणि गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाला. वैजापूरजवळ हा भीषण अपघात झाला असून हे दोघंही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत. मदत वेळेवर पोहोचल्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. या गाडीत दोघेच जण होते आणि त्यांना सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, नुकतंच समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. भरवीर ते इगतपुरी हा समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा असून समृद्धी महामार्गाचं 701 किमी पैकी 625 किमी काम पूर्ण झालं आहे. लोकार्पणानंतर भुजबळ यांनी देखील अपघाताबाबत चिंता व्यक्त केली आहे.