आपण पाहतो की चोर वस्तूंच्या चोरी करून नेतात. या मध्ये मग गाडी, सोन किंवा इतर वस्तू असो. पण इथ जगावेगळीच चोरी झाली आहे. चक्क विहीरच चोरीला (stolen) गेली आहे. पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील एका गावात असाच एक प्रकार समोर आला आहे. उर्से आंबाडी पाडा येथील विहिरीचे काम ग्रामपंचायत पेसा योजनेतून मंजूर होऊन सुरू झले होते. या विहिरीच्या (the well) कामासाठी दोन लाख 50 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे या विहिरीचे काम वाटप होऊन काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता.
ज्येष्ठ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीचा लागला धक्का, शौचालयात नेऊन केला सामूहिक बलात्कार
परंतु घडल अस की, ठेकेदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करताच वाघोबा ट्रान्सपोर्ट नावाच्या खात्यावर ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून 82 हजाराच्या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. खरतर डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेमध्ये ‘पेसा’ निधीमधून एक विहीर मंजूर करण्यात आली होती.
परंतु अजब गोष्ट म्हणजे विहीर जागेवर नसल्याचे म्हटले जात आहे. हा धनादेश कामाचे कंत्राट घेणारी व्यक्ती किंवा एजन्सीच्या नावे देणे आवश्यक आहे. परंतु बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या व्यक्तीच्या नावे देण्यात आल्याने यात मोठा घोळ असल्याचा आरोप केला जात आहे.